पैंजणाचा नाद आला गोड कानी गं
उंबरठ्यावर पाऊल दिसतंय कोण आले गं ||ध्रु||
पिवळी साडी, पिवळी चोळी, अंगी लेउनी
वैभवाचा साजे साज गळा लेऊनी
कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली गं ||१ ||
पिवळी साडी, पिवळी चोळी, अंगी लेउनी
वैभवाचा साजे साज गळा लेऊनी
कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली गं ||१ ||
हिरवा रंग अती खुलवी खुलवि
हाती चुडा हिरवा भांगी लाल सिन्दुर
जय भवानी तुळजापूर ची दारी आली गं ||२||
पाही वळूनी दारातूनी मात माऊली
भक्त रक्षणा अष्टभुजा केली धरणी
सत्पशृंगी देवी आली आता बाई ग ||३||
रूप तिचे लावण्याचे रंग तांबूल
माहुरा श्री रेणुका ही शालू ही लाल
लेकीला ही बघण्या आली दारी माझ्या ग||४||
माय माऊली कुलस्वामिनी दारी आली ग
पाऊल दिसता लोटांगण दादी घाली ग
कुलस्वामिनी म्हाळसाई ती दारी आली ग || ५||
बोल भवानी की जय ||
Comments
Post a Comment