हरि चला मंदिरा म्हणती गोपिका म्हणती राधिका |
भावे ओवाळीती यदुकुळतिलका || ध्रु||
भावे ओवाळीती यदुकुळतिलका || ध्रु||
एकीकडे राई एकीकडे रखुमाई |
भावे ओवाळीती हरिसी तू होसी दो ठाई||हरि||१||
अष्टादिक सोळा सहस्त्र ज्याच्या सुंदरा|
जिने जिने प्रार्थिले ज्यासी तियेच्या घरा || हरि||२||
एका जनार्दनी हरी तू लाघवी होसी|
इतक्याही भोगुनी ब्रम्हचारी म्हणविसी|| हरि||३||
Comments
Post a Comment