कथिली गीता कृष्णे पार्था मोहाचा तू त्याग करी सौख्याचा संसार करी.....||धृ||
प्रथम अध्यायी सैन्य पाहुनी अर्जुन मोहित झाला|म्हणून द्वितीय अध्याय त्याला सांख्य योग तो वदला, आचरावे तत्वाला| देह विनाशी शोक कशाशी उठ घेई तू चाप करी| सौख्याचा संसार करी ....||१||
Shree Madbhagwad Geeta Saramrut |
कारण वाचूनी राहशील कैसा प्रकृती कर्मा करोनी| यास्तव विहिता विहित कर्म ते करी फल आशा त्याजूनी, कथि तिसऱ्या प्रकरणी| चौथ्याध्याई अनंतशाही ब्रम्हरूप ते हृदय धरी| सौख्याचा संसार करी.....||२||
कर्मयोग सन्यासी एकच लक्षण कथि सिद्धांचे समदृष्टीचे ब्रम्ही रंगले साचे कृत्कृत्याचे, पंचमअध्यायाचे| साधण्यास योग अभ्यास षष्ठी अध्याय कथि हरी सौख्याचा....||३||
ज्ञान विज्ञान ही ज्ञाना कथूनी मायिक जग उत्पत्ती| त्रिगुणात्मक माम नाय दुस्तर तरी शरण जे येती सप्तमी| भगवत भक्ती कथि आठव्यात सतत चींतने मृत्यू समयी पहावा तो हरी| सौख्याचा संसार करी ....||४||
भक्त अनन्य जिवलग माझा मी त्याचा कैवारी| हो वैश्य शूद्र अथवा नारी मम पदीचे अधिकारी, कथि नवव्यात मुरारी| दहाव्या अध्यायी अनंत वर्णी विभूती कितीतरी | सौख्याचा संसार करी ...||५||
अकराव्यात विस्वरुप ते अर्जुन पहाता झाला| अंत न बघता महाभयंकर काळाच्या काळाला| जग शासन कृत्याला भक्ती सोपा भगवत रूपा बारावा हा हृदय धरी| सौख्याचा संसार करी ....||६||
तू क्षत्रिय नव्हे क्षेय योग तो तेराव्या मध्ये कथिला| शरीर क्षेय जने त्याला तो क्षेय जाती वदला| मम प्रकृती पुरुषाला चौदाव्यात त्रिगुण वृत्तात गुनातील परी मात हरी| सौख्याचा संसार करी ...||७||
वेदाचे जे परम गुह्य ते कथिले पंधराव्यात| क्षराक्षराहूनी विभिन्न मजला पुरुषोत्तम म्हणतात केवळ अभिमानात| सोळव्यात सभाग्य पार्था दैवी संपत्ती कथन करी| सौख्याचा संसार करी.....||८||
उपदेशी श्रद्धायय मागा सतराव्या अध्यायी | गुणानुसारे वरते श्रद्धा राजस तामस पही हो सात्विक अनुयायी तो अठरावा| ध्यानी धरावा टाकुनी सर्वही हरी वरी | सौख्याचा संसार करी .....||९||
ऐकून भगवंताच्या वचना अर्जुन सावध झाला |चुडामनी ज्ञानेशा सेवी त्या अमृतमय वाचनाला|गीता तत्पर्याला जेथे नरनारायण तेथे भाग्य विजयश्री सतत खरी | सौख्याचा संसार करी .....||१०||
||जय कृष्ण हरी ||
Comments
Post a Comment