Om Asato Maa Sadgamay: ॐ असतो मा सद्गमय


पवमान मंत्र


पवमान म्हणजे एक असे तत्व जे पूर्ण पृथ्वी ला व्यापून टाकणारे आहे त्या तत्वाचा शोध वा मागोवा करणे किंवा त्याला समजून घेऊन त्याचे जीवनातील स्थान शोधणे हे महत्वाचे. खालील मंत्र हा असाच एक वेगळा अनुभव आपल्याला देऊन जाणार आहे त्याच्या नित्य पठणाने त्यामागील अर्थ आपल्याला हळू हळू समजू लागेल आणि जीवनातील तो महत्वाचा असा प्राणवायू आपल्याला गवसला आहे असा अनुभव नक्कीच आपल्याला मिळेल.

उदा. जसे की हवा, हवे शिवाय जीवनाची कल्पनाच आपण करू शकत नाही. तोच आपला प्राणवायू आहे. ज्यात मनुष्य, प्राणी सर्वच जण प्राणवायू घेऊ शकतात आणि ज्याच्या मुळे इथे जीवन जगू शकतात.

या खालील श्लोकात आपण अश्याच एका तत्वा बद्दल जाणून घेणार आहोत .
ॐ असतो मा सद्गमय।

श्लोक

ॐ असतो मा सद्गमय।
तमसो मा ज्योतिर्गमय।
मृत्योर्माअमृतं गमय ॥
ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॥
- बृहदारण्यकोपनिषद्

अर्थ: हे देवा! मला असत्या पासून दूर सत्याच्या मार्गावर ने, अर्थात जे सत्य आहे, जे
शाश्वत आहे त्याचे मला ज्ञान होऊ दे.
मला अंधरापासून प्रकाशाकडे ने, म्हणजेच माझे अज्ञान कायमचे दूर होऊ दे. माझी वाटचाल मृत्यू पासून दूर अमरत्त्वा कडे होऊ दे, आणि माझ्या मनातील तगमग अगदी शांत शांत होऊ दे. 









Comments