दिव्याच्या अमावसेच गाणं
येते आषाढ संपता
अमावस्या दिव्याची
पाटावरी करू पूजा
उजळत्या दीपांची।।ध्रु।।
माझा दिवा आहे छान
मोठ्या दिव्यामध्ये त्याला मान
हळदी कुंकू वाहून
वस्त्रमाळा कापसाची।।1।।
हजार दिवे मांडले बाई
उठून दिसते त्यात समई
आवड दिव्यांना लाह्या फुटाण्याची।।2।।
उकडून घेऊ दिवे पाच
नेवेद्य खरा असतो हाच
आता वेळ झाली बाई कहाणी वाचण्याची।।3।।
झाली पूजा छान दिव्याची
प्रतीक्षा आता श्रावणाची
हात जोडून करू पूजा ग जिवतीची।।4।।
पाटावरी करू पूजा
उजळत्या दीपांची
सादर आभार :
या कवितेक्या कवयित्री
मंजुषा रविंद्र शेवतेकर, औरंगाबाद यांचे सादर आभार. कविता छान आहे म्हणून खास रसिकांसाठी इथे देत आहे.
या कवितेक्या कवयित्री
मंजुषा रविंद्र शेवतेकर, औरंगाबाद यांचे सादर आभार. कविता छान आहे म्हणून खास रसिकांसाठी इथे देत आहे.
Comments
Post a Comment