Dharati Mata Geet |
धरती धरती तमाम धरती
या धरतीला घालते पाणी
गुणवंत सासू सासरे
सौभाग्य भ्रतार नेत्री काजळ
कपाळी कुंकू हाती चुडा
स्वर्गी मार्ग जाऊ चला
कृष्ण म्हणती कोण चालली
या धरतीला पाणी घालते ती चालली
जळी भरी, जळी भरी
जळी माणिक मोत्याची कळी
कळी गेली वैकुंठाला
वैकुंठाचा घंटा वाजला
जगदीश महाराज आम्हा भेटला
पहिल्याने लाल दुसऱ्याने जटाभार
तिसऱ्याने मोतीमाळ
चौथ्याने चंद्रहार
पाचव्याने सूर्यनारायण
धरित्री मातेस नमस्कार ||
सादर आभार :
या कवितेच्या संकलक श्रीमती निर्मला जोशी कोपरगाव यांचे मनापासून आभार त्यांनी हे साहित्य जपून ठेऊन आमच्या पिढी पर्यंत पोहोचविले. म्हणूनच ते आज मी इथे
खास तुमच्या साठी देऊ शकले.
Comments
Post a Comment