Shree Vatsavitrichi Aarati- वटसावित्रीची आराती

वटसावित्री चे हे व्रत सौभाग्यवती  स्त्रियांनीच ज्येष्ठ मास ट्राय
त्रयोदशीला करावयाचे असते. सौभाग्य कायम राहावे म्हणुन हे व्रत अवश्य पाळले पाहिजे अशी प्रथा आहे. या दिवशी बाहेर जाऊन वडाच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे. या दिवशी  स्त्रिया उपवास धरून वडाच्या झाडाची पूजा करतात, त्यात प्रामुख्याने वडाच्या झाडाला १०८ प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे.  हे त्रिरात्र असे व्रत आहे. 
या व्रताच्या निमित्याने स्त्रिया वडाच्या झाडाच्या सानिध्यात येतात व शरीराला लागणारा प्राणवायू  जास्त प्रमाणात शरीरास मिळतो व मन आणि आरोग्य दोन्हीही निरोगी राहते. तसेच जास्तीत जास्त प्रदक्षिणा घातल्याने आरोग्य निरोगी राहते. मन प्रफुल्लित होते व पुढची वाट मार्गक्रमणासाठी एक वेगळीच ऊर्जा मिळते हे विशेष, तेंव्हा नक्कीच उद्या सर्वांनी घरात पूजा न करता थोडे बाहेर पडा.

आरती वटसावित्रीची

अश्वपती पुसता झाला | नारद सांगताती तयाला |अल्पायुषी सत्यवंत |सावित्रीने का प्रणीला | आणखी वर वरी बाळे | मनी निश्चय केला | आरती वडराजा ||१||

आरती वडराजा | दयावंत यमदूता | सत्यवंत ही सावित्री | भावे करीन मी पूजा| आरती वडराजा ||ध्रु||

ज्येष्ठ मास त्रयोदशी | करिती पूजन वडाशी || त्रिरात्र व्रत करुनिया| जिंकी तू सत्यवंताशी | आरती वडराजा ||२||

स्वर्गा वरी जाऊनिया | अग्निखांब कचळीला | धर्मराजा उचकला | हत्या घालील जीवाला | येई ग पतीव्रते || पती नेई गे आपुला | आरती वडराजा ||३||

जाऊनीया यमापाशी | मागतसे आपुला पती | चारी वर देऊनिया | दयावंत द्यावा पती || आरती वडराजा ||४||

पतीव्रते तुझी कीर्ती| ऐकुनी ज्या नारी | तुझे व्रते आचरिती | तुझी भुवने पावती|| आरती वडराजा ||५||

पतीव्रते तुझी स्तुती | त्रिभुवनी ज्या करिती | स्वर्गी पुष्वृष्टी करुनिया आणिलसी आपुला पती| अभय देऊनिया| पतीव्रते तारी त्यास | आरती वडराजा ||६||


Comments