कल्याण करी रामराया: Kalyan Kari Ramraya

 



कल्याण करी रामराया | जनहित विवरी ||ध्रु ||

तळमळ तळमळ होतचि आहे| हे जन हाति धरी दयाळा ||१||

अपराधी जन चुकतचि गेले| तुझा तूची सावरी दयाळा ||२||

कठिण त्यावरी कठीणचि जाले|| आता न दिसे उरी दयाळा || ३||

कोठे जावे काय करावे | आरंभिली बोहरी दयाळा ||४||

दास म्हणे आम्ही केले पावलों| दयेसि नाही सरी दयाळा ||५||

जय जय रघुवीर समर्थ ||


Comments