चैत्रगौर महिती आणि तिची आरती

देशभरात पसरलेल्या विविध उपसंस्कृती, खानपाण, वेगवेगळी जीवनशैली, राहणं सहन, वेगवेगळे बदलणारे मोसम आणि हजारो वर्षांच्या परंपरा यांची एकत्रित घातलेली सांगड म्हणजे भारतीय संस्कृती. ती अनेक प्रसिद्ध आध्यात्मिक पारंपरिक आणि श्रध्देचे आश्रयस्थान आहे. भारतीय संस्कृतीला स्वतंत्र अशी वेगळी वैशिष्ट्ये आणि परंपरा लाभलेली आहे. भारतीय संस्कृती ही अतिप्राचीन आहे. ती गगनाप्रमाणे विशाल व सागराप्रमाणे अपार आहे, भारतीय संस्कृती गगनाप्रमाणे विशाल व सागराप्रमाणे अपार आहे, अश्याच एका संस्कृती बद्दल आज आपण इथे माहिती घेणार आहोत.


चैत्र गौर







महाराष्ट्रात चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात चित्र शुक्ल त्रितिये पासून चैत्रगौर बसविली जाते. चैत्र गौर म्हणजे माहेरी आलेली लेक असे संबोधले जाते. देवीला झोपाळ्यात बसवून महिनाभर म्हणजे चैत्र शुक्ल तृतीया ते वैशाख शुक्ल तृतीया( अक्षय तृतीये )पर्यंत तिची पूजा केली जाते.शिवपत्नी पार्वतीची ही गौरी रूपातील पूजा होय.

चैत्र महिन्यात मराठी स्त्रिया आपापल्या घरी हा समारंभ साजरा करतात. एका छोट्या पितळी पाळण्यामध्ये गौरीची स्थापना करतात, व महिनाभरातल्या कोणत्याही एका दिवशी शक्यतो देवीचा वार बघून मंगळवार किंवा शुक्रवार बघून आजूबाजूच्या स्त्रियांना हळदीकुंकवाला बोलावतात. कोकणात घरी आलेल्या स्त्रिया व कुमारिका यांचे पाय धुऊन त्यांच्या हातावर चंदनाचा लेप लावतात. भिजविलेले हरभरे (याच काळात शेतातून प्रत्येकाच्या घरी येत असल्यामुळे ) आणि फळे यांनी त्यांची ओटी भरतात. तसेच उन्हाळा असल्यामुळे थंड म्हणून कैरीचे पन्हे, कैरी घालून वाटलेली हरबऱ्याची डाळ देतात. सर्वजणी मिळून गौरीची आरती करतात. घरातील मुली व स्त्रिया हळदी कुंकू करतात त्यावेळी चैत्रगौरीपुढे शोभिवंत पदार्थांची आरास मांडण्याची पद्धतही आहे. या महिन्यात गौरी आपल्या माहेरी येते अशी कल्पना आहे. अशी यथसांग पूजा झाल्यावर संध्याकाळी गौरीला हलऊन आधी ज्या ठिकाणी ठेवली होती त्या ठिकाणी ठेवतात. अक्षय तृतीयेला खीर गुळाची पोळी चां नैवद्य दाखवतात तर काही ठिकाणी दहिभाताचा नैवद्य दाखवतात आणि घरासाठी शांतता, वैभव, समृद्धी आशिर्वाद मागतात व तिची पाठवणी करतात. अशी ही चैत्रागौर आल्यापासून घरात चैतन्याचे वातावरण असते.

चैत्रागौरी ची आरती

जय देवी जय देवी जय चैत्रा गौरी |
स्वागत करीते तुझे माझ्या घरी|| ध्रु || जय देवी जय देवी...

आगमन झाले तुझे चैत्र तिजेला |
पितळेचा लख्ख झोपाळा सजला ||
रेशमी आसन बैसाया दिले |
झोपाळयाचा झोका मंद सा चाले || १ || जय देवी....

थंड गार पाणी लोटी भरून
वाळ्याचे पाणी घे श्वास भरून ||
गजरा मोगर्याच शिरी माळीला |
उन्हाळ्या चा दाह कमी ग केला || २ ||जय देवी....

तुझ्या आवडीची करंजी केली |
मधुर पन्हयाणे वाटी ग भरली |
लाल कलिंगड खरबूज केशरी |
हापूस आंब्याचा नैवेद्य दावी || ३ || जय देवी.....

मैत्रिणी जमती रसपाणाला |
डाळ कैरीची ऊस हरबरा |
खीर पदका कडी ओटी ग भरली |
हास्य विनोदात सांज ही सरली || ४|| जय देवी .....


शितोपचार घेऊन आंबा संतोषे |
अक्षय तीजेला घरी जाया निघे |
कानोला दहीभात निरोप दिला |
विरह दुःखे माझ्या डोळा ग भरला || ५ || जय देवी जय देवी ....









Comments