जय जय सत्चित् स्वरूपा स्वामी गणराया - शेगांवच्या गजानन महाराजांची आरती

Shree sant gajanan maharaj aarati sangrah shegaon
Shree sant Gajanan Maharaj aarati sangrah 

जय जय सत्चित् स्वरूपा स्वामी गणराया| अवतरलासी  भुवर जड मुढ ताराया || जयदेव जयदेव ||ध्रु ||

निर्गुण ब्रम्ह सनातन अव्यय अविनाशी |  स्थिरचर व्यापून उरले जे या जगताशी || ते तू तत्व खरोखर नि: संशय असशी| लीला मात्रे धरिले जे मानव देहासी || जयदेव जयदेव  || १ ||

होऊ न देशी त्याची जाणीव तू कवणा | करुनी गणी गण गणात बोते या भजना|| धाता हरिहर गुरूवर तूची एक सदना | जिकडे पहावे तिकडे तू दिसशी नयना || जयदेव जयदेव || २||

लीला अनंत केल्या बंकट सदनास | पेटविले त्या अग्नी वाचून चिलमेस || क्षणात आणिले जीवन निर्जल वापीस || केला ब्रम्हगिरीच्या गर्वाचा नाश || जयदेव जयदेव || ३ ||

व्याधी वारून केले कैका संपन्न || करविले भक्ता काही विठ्ठल दर्शन | भवसिंधू हा तरण्या नौका तव चरण || स्वामी दासगणू चे मान्य करा कवण ||जयदेव जयदेव || ४ ||

जय जय सत्चित् स्वरूपा स्वामी गणराया| अवतरलासी  भुवर जड मुढ ताराया || जयदेव जयदेव ||




Comments