मंगळागौरी आणि तिच्या 2 आरत्या - Mangalagauri Aarati

आपल्या भारतीय संस्कृतीत सण  व्रत आणि वैकल्य याना अनन्य साधारण महत्व आहे . आता उद्या पासून श्रावण सुरु होणार आहे. श्रावण हा सर्व महिन्यात श्रेष्ठ असा हा महिना या महिन्यात पावसाने आपली हजेरी लावलेली असते, सर्वदूर पावसाच्या सरी येत जात असतात , कधी ऊन तर कधी हलक्याच पावसाच्या सरी मनाला स्पर्शून जातात, या अशा चैतन्यमय वातावरणात मन खूप उल्हसित झालेले असते . दूरवर सगळीकडे हिरवीगार चादर पसरलेली असते त्या हिरव्या शालूने धरती माता आपल्या सर्वाना आनंदाने बागडताना दिसते म्हणूनच त्या अशा उल्हसित वातावरणात आपल्यालाही निसर्गाशी संवाद करावासा वाटणे त्यात नवल ते काय?  

या  महिन्यात आपण जे सण साजरे करतो ते निसर्गाशी एकरूप होण्यासाठीच असतात  प्रामुख्याने बघायचे झाले तर श्रावण सोमवार, मंगळागौर, नाग पंचमी अशी कितीतरी नावे आपल्याला सांगता येतील. त्यापैकीच एक मंगळागौर या बद्दल आपण आज माहिती बघणार आहोत. 

मंगळागौर ! सासरहुन माहेरी आलेल्या नवविवाहित मुलीला,  तिच्या माहेरी मैत्रिणीं सोबत मनमोकळ्या गप्पा मारता याव्यात तसेच दोन क्षण का होईना बालपणीच्या त्या सर्व आठवणी परत ताज्या करता याव्यात म्हणून  साजरा केलेला हा सण , असे म्हणतात पार्वतीने शंकराला मिळवल्यानंतर जेंव्हा प्रथम ती वडिलांकडे येते तेंव्हा तिने हे व्रत आपल्या शाक्यांसोबत आपल्या दोन्ही कुळांचा उद्धार व्हावा, सगळ्यांना सुख शांती आणि समृद्धी लाभावी म्हणून केले होते. ते श्रावणातल्या मंगळवारी केल्यामुळे त्याला मंगळागौरी व्रत असे म्हणतात. 

या व्रतात निसर्गाशी संवाद म्हणून हे व्रत नदीच्या काठी वाळूत महादेव करून त्याची पूजा करतात तसेच सासरच्या किंवा माहेरच्या अंगणात  हे व्रत करतात, या दिवशी  महादेवाच्या प्रतिमेला किंवा वाळूच्या केलेल्या महादेवाची प्रामुख्याने पूजा करतात त्यासाठी निसर्गात मिळणाऱ्या सर्व फुला पानांचा  उपयोग आरास करण्यासाठी  करतात त्या निमित्याने आपला निसर्गा संवाद होतो. नैवेद्याला पंचपक्वान्न केले जाते ,  रात्री सर्व मैत्रिणी जागर करून आपल्या लहानपणीच्या सर्व आठवणी जाग्या करतात त्यात प्रामुख्याने मंगळागौरी गीत  पारंपरिक पद्धतीने नाचून , झिम्मा फुगडी खेळून जल्लोषात साजरा करतात . यातून जी ऊर्जा त्यांना मिळते ती पुढील आयुष्यात नक्कीच कामी  येते . अश्या छोट्या छोटया आनंदातच खऱ्या जीवनाचे गूढ लपलेलं असत  हीच शिदोरी पुढील आयुष्यासाठी मनात साठवून ठेवायची असते आणि पुढील आयुष्याचे मार्गक्रमण करायचे असते.  


मंगळागौर आरती 1

जय देवी मंगळागौरी । ओवाळीन सोनिया ताटी ।।
रत्नांचे दिवे ।माणिकांच्या वाती । हिरेया मोती ज्योती ।। धृ ।।

मंगल मूर्ती उपजली कार्या । प्रसन्न झालीं अल्पायुषी राया ।।
तिष्ठली राज्याबाळी । उपोषण द्यावया ।। १ ।। जय देवी ... 

पूजेला ग आणिली...  
जाई  जुई च्याग कळ्या । सोळा तिकटी, सोळा दुर्वा, सोळा परीची पत्री ।।
जाई जुई अबूला शेवंती नागचाफे । पारिजातक मनोहरे । गोकर्ण महाफुले नंदेटे तगरे ।। २।।  जय देवी ...

साळीचे ग तांदूळ । मुगाची दाळ ।। 
आळणी खिचडी रांधिती नार ।।आपल्या पतीलागी  सेवा करिती फार ।। ३।। जय देवी ...

डुमडुमें डुमडुमें  वाजंत्री वाजती । कराची कंकणे गौरीला शोभती ।
शोभती बाजूबंद, कानी कापांचे गवे । ल्यायली आंबा शोभे ।। ४ ।। जय देवी ...

न्हाऊनी माखुनी मौनी बैसली । पाटावरची चोळी शिरोदक नेसली ।।
स्वच्छ बहुत होऊनी , आंबा पुजू लागली ।। ५ ।। जय देवी ...

सोनिया ताटी घातल्या पंचारती । मध्ये उजळती कापूरच्या वाती ।।
करा धूप दीप आता नैवेद्य  षड्रस पक्वानांने , ताटी भरा बोने ।। ६।।जय देवी ...

लवलाहे तिघे काशीसी निघाली , माऊली मंगळागौर भिजवू विसरली ।।
मागुती परतोनिया आली, अंबा स्वयंभू देखिली । देऊळ सोनियाचे, खांब हिरेयांचे, कळस मोतियांचा ।। ७।।जय देवी ...
मंगळागौरी माता की  जय ।

मंगळागौरी ची आरती २ 


जय देवी मंगळागौरी |
सुवासिन मी तुला पुजिते|
जय देवी मंगळागौरी||धृ||

कुमकुम तिलक माझ्या लल्लाटी
मंगल मनी हे शोभत कंठी
रत्न पाचुचा चुडा मनगटी
स्त्री जन्माचे हे आहिव लेणे
तुझ्या कृपेने हे मला लाभले
जय देवी मंगळागौरी||१||

शिवशंकराहुनही प्रेमळ भोळा
दिधलासी पती तु भाग्यवतीला
देहाच्या देव्हारी पुजिन त्याला
हृदयाच्या वाती प्राणांच्या ज्योती
अमृत तेज लाऊनी तेजाळते
जय देवी मंगळागौरी ||२||


Mangala gauri aarati 2

Jai Devi Mangala gauri, suvasin mi Tula pujite jai Devi Mangala gauri||dhru||

Kumkum tilak mazya lallati Mangal mani he shobhat kanthi, ratna pachucha chuda mangati stri janmache he aahiv lene , tuzya krupene mala labhale jai Devi Mangala gauri|| 1||

Shivshakarahunahi premal bhola, didhala si pati tu bhagyavatila
Dehachya devhari pujin tyala , whridhayachya vati prananchya Jyoti  amrut tej launi tejalate jai Devi Mangalagauri||2||

Comments

Post a Comment