1. श्रीराम जयराम जय जय राम |
श्रीराम जयराम जय जय राम |
श्रीराम जयराम जय जय राम ||
आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम
आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥ धृ ॥
कनकाचे थाट करी धनुष्यबाण ।
कनकाचे थाट करी धनुष्यबाण ।
मारुती हा पुढे उभा हात जोडून ।
मारुती हा पुढे उभा हात जोडून ॥ १ ॥
श्रीराम जयराम जय जय राम ||१||
भरत शत्रुघन दोघे चवर्या ढाळीती ।
भरत शत्रुघन दोघे चवर्या ढाळीती ।
सिंहासनी आरुढले जानकीपती ।
सिंहासनी आरुढले जानकीपती ॥ २ ॥
श्रीराम जयराम जय जय राम ||२||
लक्षुमणाने सेवा केली रामचंद्राची ।
लक्षुमणाने सेवा केली रामचंद्राची ।
चौदा वर्षे आहार निद्रा नाही तयासी ।
चौदा वर्षे आहार निद्रा नाही तयासी ॥ ३ ॥
श्रीराम जयराम जय जय राम
विष्णुदासनामा म्हणे मागणे हेची ।
आता मागणे हेची ।
विष्णुदासनामा म्हणे मागणे हेची ।
अखंडित सेवा घडो रामचंद्राची ।
अखंडित सेवा घडो रामचंद्राची ॥ ४ ॥
श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम
आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम
आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥
2. साफल्य निजवल्या कौसल्या माता ।
जनक सुकन्याऽनन्या मुनिमान्या साती ॥
खेचर वनचर फणिवर भरत निजभ्राता ।
धन्य तो नृपनायक दशरथ पीता ॥ १ ॥
जय देव जय देव जय रविकुळटिळका ।
आरती ओंवाळूं त्रिभुवननायका ॥ धृ. ॥
आचार्या गुरुवर्या कार्याचे फळ ।
रकिकुळमंडण खंडण संसारामूळ ॥
सुरवर मुनिवर किन्नर ध्याती पै सकळ ।
धन्य तो निजदास भक्त प्रेमळ ॥ जय. ॥ २ ॥
3. आरती रघुनंदन रामा...
4. दशरथराजकुमारा धृतमुक्ताहारा ।
जय देव जय देव जय सीतारामा ॥ सजलबलाहकश्यामा सच्चित्सुखधामा ॥ध्रु०॥
रविकुलराजललामा रम्यगुणग्रामा । रूपविनिर्जितकामा रुद्रस्तुतनामा । परिपालितसूत्रामा पूर्णसकलकामा । विश्वविलासविरामा विठ्ठलविश्रामा ॥जय देव जय देव०॥२॥
5. आरती रामचंद्रजींचीं ।
आरती रामचंद्रजींचीं । सुजानकि राघवेंद्रजीची ॥ धृ. ॥
ध्वजांकुश शंख पद्मचरणा ।
कांति ती लाजविती अरुणा ॥
नखमणिभाति मग्नशरणा । फलद उषशमा जन्ममरणा ॥ चाल ॥
तोडर गुल्फ गजरशाली ।
ग्रथित दशवदन, प्रभुति धृती कदन, विजित सुरसदन, भ्रमसुर कीर्ति वंदनाची ।
निरांजनी कीर्ति वंदनाची ॥ आरती. ॥ १ ॥
तडित्प्रभ पीतवसन जघनी ।
जडित कटि रत्नसुत्र वसनी ॥
जनकजा अंकित शिवजघनीं ।
शिरद्रमि मृगांकवदनी ॥चाल ॥
सुसर हे मुक्तहार कंठी ।
सरळ करि धनुष येष धरि मनुष,
सत्वरी कलुषहरण उटि तनुसि चंदनाची ॥
उटि तनुसि मलयचंदनाची ॥ आरती. ॥ २ ॥
त्रिवली राजित रुइसुम गळां ।
नाभिह्र्द लाजविती इंगळा ॥
उत्तरी यज्ञोपवित गळां ।
वक्षस्थलिं भृदगपदांग सकला ॥ चाल ॥
एकावली दिव्य खङगकोशी ।
विष्टिशत विशांग, शिरपर पिशांग, पक्षजी विशांग, घटितमणी कंकणां गदाती ॥
दिप्तीवर कंकणांगदाची ॥ आरती. ॥ ३ ॥
आनन पुर्णेदु वमन मलिनें ।
कृपार्द्रांकरण नयन मलिनें ।
स्मिताधर रदनरवेवलिनें पाहतां धृतृजन्म मलिनें॥ चाल ॥
मृगमदातिलक उंचभाळी ।
धनुषकोटी; रभिरव कोटी, रगरवकोटी, रविद्युतितरळ कुंडलाची ॥
गुंतली स्फूर्ति कुंडलाची ॥ आरती. ४ ॥
सदसि पुष्पकासना वरती ।
शिरद्रूमि छत्र लसद मूर्ती ॥
सुशोभित सहोदरा वरती ।
भक्तजन पूर्ण करिती आर्ती ॥ चाल ॥
तुंबर गान किन्नरादी ।
अप्सरा छनन, नयन कृत अनन, तनन स्वर घनन, गर्जे ध्वनी बंदि जल्पनाची ॥
मधुर ध्वनी बंदि जल्पनाची ॥ आरती. ॥ ५ ॥
6. आरती निजबोधारामा
स्वस्वरूपोन्मुखबुद्धि वैदेही नेली । देहात्मकाभिमाने दशग्रीवे हरिली । शब्दरूप मारुतीने सच्छुद्धि आणिली । तव चरणांबुजी येऊन वार्ता श्रृत केली । जय देव जय देव निजबोधा रामा ।। १ ।।
जय देव जय देव निजबोधा रामा । परमार्थे आरती, सद्भावे आरती, परिपूर्णकामा ।। धृ० ।।
उत्कट साधुनी शिळा सेतू बांधोनी । लिंगदेह लंकापुरी विध्वंसूनी । कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी । देह अहंभाव रावण निवटोनी ।। २ ।।
प्रथम सीताशोधा हनुमंत गेला । लंका दहन करुनी अखया मारिला । मारिला जंबुमाळी भुवनी त्राहाटिला । आनंदाची गुढी घेऊनिया आला ।। ३ ।।
निजबळे निजशक्ति सोडविली सीता । म्हणुनी येणे झाले अयोध्ये रघुनाथा । आनंदे ओसंडे वैराग्य भरता । आरती घेऊनी आली कौसल्यामाता ।। ४ ।।
अनाहतध्वनि गर्जती अपार । अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार । अयोध्येसी आले दशरथकुमार । नगरीं होत आहे आनंद थोर ।। ५ ।।
सहजसिंहासनी राजा रघुवीर । सोऽहंभावे तया पूजा उपचार । सहजांची आरती वाद्यांचा गजर । माधवदास स्वामी आठव ना विसर ।। ६ ।।
७. उत्कट साधुनि शिळा सेतू बांधोनी |
लिंगदेह लंकापुर विध्वंसूनीं ||
कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी |
Comments
Post a Comment