वास्तविक केकावलीमध्ये १२२ श्लोक आहेत, त्यातील काही निवडक येथे देत आहे
मातृमहिमा
पिता जरि विटे, विटो; न जननी कुपुत्री विटे;
दयामृतसार्द्रधी न कुलकज्जले त्या किटे; ।प्रसादपट झांकिती परि परा गुरूचे थिटे;म्हणूनि म्हणती भले ’न ऋण जन्मदेचे फिटेवरप्रसादयाचनाा सुसंगति सदा घडो सुजनवाक्य कानीं पडोकलंक मतिचा झडो विषय सर्वथा नावडो ।सदन्घ्रिकमळी दडो मुरडिता हटानें अडोवियोग घडता रडो मन भवच्चारित्री जडो ॥न िनश्चय कधी ढळो; कुजनिवघ्नबाधा टळो;न िचत्त भजनी चळो मति सदुक्तमार्गी वळो; ।स्वतत्त्व हृदया कळो; दुरिभमान सारा गळो;पुन्हा न मन हे मेळो दुिरत आत्मबोधे जळो ॥मुखी हरि ! वसो तुझी कुशलधामनामावली,क्षणांत पुरवील जी सकल कामना, मावली; ।कृपा करिशि तू जगत्रयनिवास दासांवरी,तशि प्रकट हे ि weनजाश्रितजनां सदा सावरी ॥दयामृतघना ! अहो हरि ! वळा मयूराकडे,रडे शिशु, तयासि घे कळवळोनि माता कडे।असा अतिथि धार्मिकस्तुतपदा कदा ! सापडे ?तुह्मा जड भवार्णवी उतरिता न दासा पडे
भक्तमयूरकेकावलि
श्रीरामा ! तू स्वामी अससी माज्या शिरावरी जागा; ।
आम्हांसि तुज्या पायांवाचुनि निर्भय नसे दुजा जागा ॥१॥
बहु जन्म विसरलो तुज, परि तू आम्हासि विसरला नससी ।
अंतर्बाह्य कृपाळा ! सर्वा जिवांसि वेष्टुनी अससी ॥२॥
कल्पद्रुम तू रामा ! ज्याची जसि भावना तसा फळसी; ।
भोगिति दुःखे जीव स्वगुणे तू निर्दयत्व नातळसी ॥३॥
"सत्संगती धरावी, सच्छास्त्रश्रवण आदरेचि करा," ।
म्हणसी, ’मग मी बुडतां देइन भवसागरी तुम्हांसि करा." ॥४॥
सत्योपदेशवाक्ये तुजी असी ऐकिली; परंतु मन ।
आटोपेना रामा ! म्हणुनि तुला करितसे सदा नमन ॥५॥
आता प्रभो ! दयाळा ! मज दीनावरि करूनिया करुणा ।
स्वपदाब्जी मन्मानसभृंग रमो उगउं दे कृपा अरुणा ॥६॥
नाही सहाय तुझिया नामाविण निपुण मज जगत्रितयी; ।
त्वन्नाम मित्र जेव्हा, सत्संग घडे त्रिलोकमित्र तयी ॥७॥
म्हणउनि नाम तुजे या मुखात राहो सदाहि मधुरतम, ।
रत मन जेथे मुनिचे ज्यांचे गेले समस्त दूर तम ॥८॥
उद्धरिला जो पापी पुत्रमिषे नाम घे अजामिळ तो, ।
तारी हाहि जन तसा, दंभेहि जरी पदी तुजा मिळतो ९
अपराध फार केले, परि आतां हात जोडिले स्वामी ! ।
करुनि दया तारावे; आवडि वाढो सदा तुजा नामी ॥१०॥
सेवक तुजा म्हणवितो, श्रीरामा राघवा सख्या म्हणतो; ।
होसी उदास तरि हो, होत नसे मी उदास आपण तो; ॥११॥
संसारसागरी तू तारक ऐसेचि संत वदतात; ।
वदता तदीय नामे देतो दासांस तो स्वपद तात ॥१२॥
ऐसे औदार्य तुजे प्रभुत्व करुणाकरत्व ऐकोनी ।
आलो शरण स्वामी ! जोडुनिया हस्त मस्तकी दोनी ॥१३॥
पाये मज दीनाला रामा ! लोटू नकोचि बा ! दूर ।
उद्धरिले बहु पापी, याविषयी तू रघूत्तमा ! शूर ॥१४॥
क्लेशाक्रांतस्वांत श्रीरामा ! तुज जरी न विसरेल, ।
तरि भय नसेचि काही, साराही क्लेशतापहि सरेल ॥१५॥
आम्हांसि नाम मात्र क्लेशाब्धीमाजि नाव हे ठावे; ।
गावे तेचि प्रेमे, स्वबिरुद रामा ! तुवांहि गांठावे. ॥१६॥
केवळ भजनाचिकडे जरि ठेविसि दृष्टि तरि नसे थारा, ।
आपलिया थोरपणावरि ठेउनि दृष्टि दीन हा तारा ॥१७॥
स्वामी ! आम्ही दुर्बळ, तू रघुवीरा ! समर्थ यासाटी ।
देवुनि अभय कराते ने स्वस्थानासि, शुद्ध यश थाटी ॥१८॥
धाव समर्था ! सदया ! भवपंकामाजि बुडतसे गाय ! ।
निकटस्था ! धर्मज्ञा ! कौतुक अद्यापि पाहसी काय ? ॥१९॥
करुणाघन तू माथा, जाळितसे मज मृगास भववणवा. ।
वृष्टि न करिता, होता उदास हे योग्य तूज न सकणवा ! ॥२०॥
Comments
Post a Comment