सदा सर्वदा योग तुझा घडावा : Sada Sarvada Yog Tuza Ghadava
सदा सर्वदा योग तुझा घडावा |
तुझे कारणी देह माझा पडावा |
उपेक्षु नको गुण वंता अनंता |
रघु नायका मागणे हेची आता ||
जय जय रघुवीर समर्थ ||
समर्थ रामदासांनी आपल्या श्लोकात म्हंटले आहे, सदा सर्वकाळ योग हा देवा तुझाच घडवा, तुझीच सांगत, शुध्द आचरण, तुझाच ध्यास मनात असावा, हे असे सतत मनात चालावे, आणि त्या योगे चांगल्या, सत्करणासाठी माझा देह, माझी काय, माझी बुद्धी, सर्व काही तुझ्या चिंतनात घालवावा.
देवा माझी तू उपेक्षा करू नको, मी पामर आहे, मला ज्ञान नाहीये पण देवा तू अनंतचा नाथ आहे, माझी उपेक्षा तू करू नकोस, हे एव्हढेच आणि एव्हढेच तुला मला माझ्यासाठी मागायचे आहे.
जय जय रघुवीर समर्थ.
खाली इंग्लिश मध्ये देत आहे
Sada Sarvada Yog Tuza Ghadava
Sada Sarvada Yog Tuza Ghadava |
tuze karani deh maza padava |
upekshu nako gun vanta ananta |
Raghu nayaka magane hechi aata ||
jay jay raghuveer Samarth ||
Comments
Post a Comment